Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Water Crisis: पुणेकरांनो सावधान! पाण्याचा अपव्यय पडणार महागात; ‘हे’ केल्यास पालिका करणार थेट कारवाई

Pune Water Crisis: पुणेकरांनो सावधान! पाण्याचा अपव्यय पडणार महागात; ‘हे’ केल्यास पालिका करणार थेट कारवाई

Pune Water Crisis: पुणे शहरावर ओढवलेल्या पाणीटंचाईच्या संकटामुळे सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. या गंभीर परिस्थितीत पाण्याचा गैरवापर थांबवण्यासाठी पुणे महानगरपालिका (पीएमसी) आता ॲक्शन मोडमध्ये आली आहे. पिण्याचे पाणी गाड्या धुण्याच्या केंद्रांवर (वॉशिंग सेंटर), स्विमिंग पूल किंवा इतर अनावश्यक कारणांसाठी वापरण्यावर प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे की, जे नागरिक किंवा संस्था या नियमांचे उल्लंघन करताना आढळतील, त्यांच्यावर थेट आणि कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

चार दिवसांत धडक मोहीम; पालिकेची विशेष पथके तैनात
पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान असल्याने नागरिकांनी अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी केले आहे. पाण्याच्या उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी महापालिकेकडून विशेष तपासणी पथकांची नियुक्ती केली जात आहे. आगामी चार दिवसांत ही पथके पुण्यातील विविध भागात फिरून पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांचा शोध घेतील आणि जागेवरच दंडात्मक कारवाई करतील.

एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू; तक्रारींसाठी हेल्पलाईन सज्ज
शहरात सोमवारपासून लागू झालेल्या एक दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या पहिल्या दिवशी कोणतीही मोठी तक्रार आली नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. नागरिकांच्या समस्यांचे वेळीच निवारण व्हावे यासाठी विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, पाणीपुरवठ्याचे व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने पाणीपुरवठा विभागातील १२ कनिष्ठ व उपअभियंत्यांच्या बदल्या केल्या आहेत. ऐन पाणीबाणीच्या काळात तांत्रिक बिघाड होऊ नये म्हणून या बदली झालेल्या अधिकाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

…तर वर्षभर संकट कायम; मान्सूनच्या आगमनाकडे डोळे
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २० जूननंतर शहरात पावसाची शक्यता आहे. वरुणराजा वेळेवर आणि पुरेसा बरसल्यास पुणेकरांवरील हे संकट टळू शकते. मात्र, जर पावसाने दडी मारली किंवा प्रमाण कमी राहिले, तर पुणेकरांना पुढील वर्षभर दिवसाआड पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागेल, अशी भीती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!