Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका! CNG-PNG दरात पुन्हा वाढ

पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका! CNG-PNG दरात पुन्हा वाढ

CNG Price Hike : आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या पुणेकरांना आणखी एक आर्थिक झटका बसला आहे. शहरात सीएनजी (CNG) आणि पीएनजी (PNG) च्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली असून वाहनधारक आणि ग्राहकांच्या खर्चात वाढ होणार आहे.

एमएनजीएल (MNGL) ने मध्यरात्रीपासून नवीन दर लागू केले आहेत. नव्या दरानुसार सीएनजीच्या किमतीत किलोमागे 1 रुपयांची वाढ करण्यात आली असून आता सीएनजीचा दर 95.75 रुपये प्रति किलो झाला आहे. तर पीएनजीच्या दरात 85 पैशांची वाढ करण्यात आली आहे. नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) च्या निर्यातीवरील शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. नव्या निर्णयानुसार डिझेलच्या निर्यातीवर प्रति लिटर 14 रुपये, तर एटीएफच्या निर्यातीवर प्रति लिटर 12.50 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

मात्र, सरकारने स्पष्ट केले आहे की देशांतर्गत बाजारात विकल्या जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे या निर्णयाचा पेट्रोल पंपावरील इंधन दरांवर तात्काळ परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तज्ज्ञांच्या मते, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या केवळ कर किंवा शुल्कांवर अवलंबून नसून आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य, जागतिक घडामोडी आणि सरकारी धोरणांवरही अवलंबून असतात. त्यामुळे सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची शक्यता कमी असली तरी भविष्यातील परिस्थितीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!