Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

गणेशखिंड रस्त्यावर पुणे विद्यापीठाजवळ बसच्या टपावरुन पडल्याने क्लिनरचा मृत्यू

गणेशखिंड रस्त्यावर पुणे विद्यापीठाजवळ बसच्या टपावरुन पडल्याने क्लिनरचा मृत्यू

पुणे : प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसच्या टपावरुन पडल्याने क्लिनरचा मृत्यू झाल्याची घटना गणेशखिंड रस्त्यावर पुणे विद्यापीठाजवळ घडली. या अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी बसचालकाला चतु:शृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संकेत देवीदास चैलवाल (वय २९, रा. मासोद, जि. अमरावती) असे मृत्युमुखी पडलेल्या क्लिनरचे नाव आहे. बबलू हमीदमियाँ मक्तेवाले (वय ३३, रा. हुडगी, जि. बिदर, कर्नाटक) याला अटक करण्यात आलेल्या बस चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी विकास इंगळे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी वाहतूक करणारी खासगी बस गणेशखिंड रस्त्याने शुक्रवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास मुंबईहून हैद्राबादकडे निघाली होती. गणेशखिंड रस्त्यावर असलेल्या वैकुंठभाई मेहता संस्थेजवळ कमान आहे. या कमानीजवळ लटकणारी वायर बसच्या टपावर अडकल्याने बसमधील क्लिनर संकेत याला बसचालक बबलू याने टपावर अडकलेली वायर काढण्यास सांगितले.

बसचालक बबलू याने गणेशखिंड रस्त्यावर बस थांबवली. त्यानंतर संकेत टपावर चढला. सदर बस कमानीतून बाहेर नेत असताना बबलू याने अचानक जोरात ब्रेक दाबला, त्यामुळे टपावर चढलेल्या संकेतचा तोल जाऊन तो रस्त्यात पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. संकेतला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत बसचालक बबलूने बसचा ब्रेक दाबल्याने टपावरुन पडल्याची माहिती मिळाली. अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी बसचालक बबलू याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील पुढील तपास करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!