पुणे : महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था ढासाळली असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. या गोष्टीला पोलीस दल कुठे तरी कारणीभूत असल्याचे विविध घडामोडींमधून समोर येत आहे. पुणे शहरात नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता पुण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने दारुच्या नशेत उरुळी कांचन येथील जेवणाचे डब्बे पुरवणाऱ्या एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा दावा केला जात आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हा दावा केला आहे. यासंदर्भात एक व्हिडिओ देखील त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. या प्रकारामुळे पुणे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
View this post on Instagram
अंधारे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, गणेश रतन दाभाडे (बिल्ला क्र. ३२१) असे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. दाभाडे हा मेसचे डबे पोचवणाऱ्या महिलेकडे वर्दीचा धाक दाखवून शरीर सुखाची मागणी करत होता. महिलेने विरोध करताच त्याने आपला पवित्रा बदलला. संबंधित पोलीस स्टेशन महिलेची तक्रारही लिहून घेत नाही, असा आरोपही शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.


