Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तिहेरी अपघाताचा थरार; ट्रक-कंटेनर आणि कारच्या धडकेत दोघांचा अंत

Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तिहेरी अपघाताचा थरार; ट्रक-कंटेनर आणि कारच्या धडकेत दोघांचा अंत

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Expressway) आज सोमवारी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली. पुणे बाजूकडून मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर ट्रक, तेल वाहून नेणारा कंटेनर आणि एका कारमध्ये तिहेरी धडक झाली. या भीषण अपघातात ट्रक चालक आणि क्लिनर यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

नियंत्रण सुटले अन्… कसा घडला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने तांदळाची पोती घेऊन जाणारा एक भरधाव ट्रक पहाटेच्या सुमारास खालापूर टोलनाक्याच्या आधी आला असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रणाबाहेर गेलेल्या या ट्रकने पुढे चाललेल्या खाद्य तेलाच्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा आघात एवढा भीषण होता की, शेजारून जाणाऱ्या ‘एर्टिगा’ कारलाही या वाहनांनी कचाट्यात घेतले. धडकेनंतर तांदळाचा ट्रक आणि ऑईल कंटेनर दोन्ही महामार्गावरच पलटी झाले.

महामार्गावर चारही लेन ठप्प; तेल-तांदळाचा सडा
अपघातानंतर ट्रकमधील तांदळाची पोती फाटून तांदूळ आणि कंटेनरमधील खाद्य तेल रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर सांडले. रस्ता तेलकट झाल्यामुळे इतर वाहनांचा घसरण्याचा धोका निर्माण झाला होता. परिणामी, मुंबईकडे जाणाऱ्या चारही लेनवरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!