Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Abdul Sattar: ‘भाजपकडून आत्ताच अशी वागणूक असेल, तर २०२९ मध्ये महायुती राहणार का?’; अब्दुल सत्तारांचा संतप्त सवाल

Abdul Sattar: ‘भाजपकडून आत्ताच अशी वागणूक असेल, तर २०२९ मध्ये महायुती राहणार का?’; अब्दुल सत्तारांचा संतप्त सवाल

Abdul Sattar: महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमधील आमदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी मित्रपक्ष भाजपच्या स्थानिक नेत्यांवर अत्यंत गंभीर आरोप करत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. “वरिष्ठांकडून आम्हाला कोणताही त्रास नाही, मात्र स्थानिक पातळीवर आमची कोंडी केली जात आहे,” असा थेट आरोप सत्तारांनी केला आहे. या सर्व वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली असून, या नाराजीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

‘मोठा भाऊ’ पक्ष संपवायला निघाल्याचा गंभीर आरोप
अब्दुल सत्तार यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना भाजपच्या स्थानिक नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, जिल्ह्यात आमची अडवणूक केली जात असून विकासकामांसाठी निधी दिला जात नाही. मोठा भाऊ (भाजप) आमचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न करत आहे. एकत्र येऊनही जर अशी वागणूक मिळणार असेल, तर मनात पश्चात्तापाची भावना निर्माण होते. २०२९ पर्यंत जर आमच्या नेतृत्वाने यावर वेळीच पाऊल उचलले नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

एकनाथ शिंदेंचा शब्द अंतिम; महायुतीचा नियम पाळणार
या बैठकीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आगामी निवडणुकीवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिंदेंनी अब्दुल सत्तार यांना महायुतीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आणि आगामी विधान परिषद निवडणूक एकत्र लढण्याचे आदेश दिले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना सत्तार म्हणाले की, “आमचे नेते एकनाथ शिंदे जे बोलतील तो आमच्यासाठी अंतिम शब्द आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही बाहेर पडून भाजपसोबत गेलो होतो. त्यामुळे त्यांच्या आदेशानुसार मी महायुतीचे नियम पाळीन, मात्र भाजपनेही आमच्या कामाचे योग्य मूल्यमापन करायला हवे.” स्थानिक नेत्यांच्या या वादामुळे महायुतीमधील समन्वय पुन्हा एकदा चर्चेत आला असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आगामी बैठकीत यावर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!