Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ketan Agrawal Death Case : सिया गोयलच्या बचावासाठी सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकील मैदानात, प्रकरणात मोठी घडामोड

Ketan Agrawal Death Case : सिया गोयलच्या बचावासाठी सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकील मैदानात, प्रकरणात मोठी घडामोड

Ketan Agrawal Death Case : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात महत्त्वाची कायदेशीर घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या बचावासाठी सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकील अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी त्यांनी अधिकृतपणे सिया गोयलची बाजू मांडण्याची जबाबदारी स्वीकारली.

प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी सांगितले की, हे प्रकरण अद्याप तपासाधीन असून त्यांची पक्षकार तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करत आहे. भारतीय संविधानानुसार प्रत्येक आरोपीला न्यायालयात स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार आहे आणि त्याच अधिकाराच्या चौकटीत बचावाची भूमिका मांडली जाईल. न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याने त्यांनी यापेक्षा अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

नेमकं काय आहे केतन अग्रवाल हत्या प्रकरण?

१८ जून रोजी २६ वर्षीय केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्याजवळील दरीत पडून मृत्यू झाल्याची सुरुवातीला नोंद करण्यात आली होती. मात्र तपासादरम्यान हा अपघात नसून नियोजनपूर्वक करण्यात आलेली हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

तपासानुसार, केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनी ट्रेकिंगच्या बहाण्याने त्याला लोहगडावर नेले. त्यानंतर त्याला दरीत ढकलल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.

दोन्ही आरोपींकडून एकमेकांवर आरोप

तपासादरम्यान सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी एकमेकांवरच कट रचल्याचे आरोप केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, चेतन चौधरीने सियानेच हत्या करण्याचा आग्रह धरल्याचा दावा केला आहे. तर सिया गोयलने हत्या करण्याची कल्पना चेतनची होती, असा प्रतिदावा केला आहे.

पोलिसांच्या मते, हे परस्परांवरील दोषारोप बचावाची रणनीती असू शकते. मात्र या सर्व बाबींचा अंतिम निर्णय न्यायालयातील पुरावे आणि सुनावणीवर अवलंबून असेल.

कोण आहे केतन अग्रवाल?

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा.
सिम्बॉयसिसमधून बीबीएचे शिक्षण पूर्ण केले.
उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता.
भारतात परतल्यानंतर वडिलांच्या बांधकाम व्यवसायात सहभागी झाला.
स्वतःचे बांधकाम प्रकल्प विकसित करण्यास सुरुवात केली होती.
फेब्रुवारीमध्ये सिया गोयलसोबत साखरपुडा झाला होता.

कोण आहे सिया गोयल?

पुण्यातील उद्योगपती प्रवीण गोयल यांची कन्या.
बी.कॉमचे शिक्षण घेत आहे.
कुटुंबाचा ड्रायफ्रूट्स आणि मसाल्यांचा व्यवसाय.
तिच्यासाठी स्वतंत्र बेकरी सुरू करण्यात आली होती.

कोण आहे चेतन चौधरी?

बीबीए पदवीधर.
कुटुंबाचा ड्रायफ्रूट्स आणि किराणा व्यवसाय सांभाळत होता.
क्रिकेटची आवड असून रणजी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!