Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Shirur Crime: गाढ झोपेत असतानाच घात! शिरूर तालुक्यात शेतकऱ्याला मध्यरात्री संपवलं; गळा कापला अन्…

Shirur Crime: गाढ झोपेत असतानाच घात! शिरूर तालुक्यात शेतकऱ्याला मध्यरात्री संपवलं; गळा कापला अन्…

Shirur crime: शिरूर तालुक्यातील वरुडे येथे रविवारी मध्यरात्री एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घराबाहेर गाढ निद्रेत असलेल्या बाळासाहेब बबन तांबे (वय ५५) या शेतकऱ्याची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने गळा कापून निर्घृण हत्या केली. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण वरुडे गावासह परिसरात कमालीची दहशत आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गाढ झोपेत असतानाच घातपात; प्रतिकाराचीही मिळाली नाही संधी
मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याचे दिवस असल्याने व्यावसायिक शेती करणारे बाळासाहेब तांबे हे नेहमीप्रमाणे रात्रीचे जेवण आटोपून घरासमोरील अंगणात झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास सर्वत्र सामसूम असताना, दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. तांबे झोपेत असतानाच त्यांच्या गळ्यावर शस्त्राने इतका खोल आणि गंभीर वार करण्यात आला, की त्यांना मदतीसाठी आरडाओरडा करण्याची किंवा स्वतःचा बचाव करण्याची साधी संधीही मिळाली नाही. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच प्राण गेला.

पहाटे उघडकीस आला प्रकार, गावात पसरली शोककळा
सोमवारी पहाटेच्या सुमारास जेव्हा तांबे यांचे कुटुंबीय आणि शेजारी घराबाहेर आले, तेव्हा बाळासाहेब रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा भयानक प्रकार पाहताच नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. या घटनेची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली. एका कष्टाळू आणि शांत स्वभावाच्या शेतकऱ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून नागरिकांमधून तीव्र संताप व हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांसमोर तपासाचे आव्हान; मारेकऱ्यांचा शोध सुरू
घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने वरुडे गावात धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासासाठी (शवविच्छेदन) शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. तांबे यांचा कोणताही जमिनीचा वाद, कौटुंबिक कलह अथवा जुने अर्थकारण होते का, यादृष्टीने पोलिसांनी तपास चक्र फिरवली आहेत. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांत अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येत असून, गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. मात्र, या घटनेमुळे ग्रामीण भागातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!