मुंबई: भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पाच कसोटी सामने येथे खेळले जाणार आहेत. या दौऱ्याचे नेतृत्व फलंदाज शुभमन गिलकडे देण्यात आले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचे कर्णधारपद कोणाकडे जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर शुभमन गिलकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.
२० जूनपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन सारख्या दिग्गज खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता बीसीसीआयने या दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. शुभमन गिलच्या रूपाने भारतीय कसोटी संघालाही नवा कर्णधार मिळाला आहे.
‘असा’ आहे भारतीय संघ:
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक, उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन, मोहम्मद जैस्वाल, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव


