Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अकरावीच्या तिसऱ्या फेरीसाठी आजपासून अर्जात दुरुस्ती करता येणार; सात लाखांपेक्षा अधिक जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

अकरावीच्या तिसऱ्या फेरीसाठी आजपासून अर्जात दुरुस्ती करता येणार; सात लाखांपेक्षा अधिक जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

पुणे : अकरावीच्या केंद्रीय स्तरावरील तिसऱ्या फेरीसाठी मंगळवारपासून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी, अर्जातील भाग-१ मध्ये दुरुस्ती करणे तसेच अर्ज भाग-२ भरणे आदी कार्यवाही करता येणार आहे. त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीमध्ये किमान १ ते १० महाविद्यालयांचा समावेश करता येईल. त्याशिवाय, नियमित फेरी २ मध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीमध्ये पसंतीक्रम अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून बुधवारी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. अल्पसंख्याक कोटाअंतर्गत प्रवेश घेणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांनादेखील नोंदणी, अर्ज-१ मध्ये दुरुस्ती करणे तसेच अर्ज भाग-२ भरणे अशी कार्यवाही करता येणार आहे. शनिवारी सकाळी १० ते सोमवारी सायंकाळी ५.३० दरम्यान विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यांना कोणते महाविद्यालय मिळाले, याची माहिती अकरावी प्रवेशाच्या पोर्टलवर जाहीर केली जाणार आहे.

याबाबतचा संदेश एसएमएसद्वारे पाठवण्यात येईल. विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. शनिवार ते सोमवार या कालावधीत कोटाअंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयांच्या लॉगिनमध्ये दर्शवण्यात येईल, असे शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!