Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune news : सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेले पाच मुलं बेपत्ता, पुण्यात पुन्हा खळबळ

Pune news : सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेले पाच मुलं बेपत्ता, पुण्यात पुन्हा खळबळ

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या पाच मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनेने शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आज सकाळी किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या या मुलांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपण अडकल्याची माहिती दिली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली आहे. मुलांचे लोकेशन मिळाले असले तरी त्यांच्याशी संपर्क तुटल्याने शोधकार्याला अडचण येत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या मुलांनी आपण किल्ल्यावरील कोणत्या भागात अडकल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी या माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू केली असून, एक विशेष पथक सिंहगड परिसरात दाखल झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, मुलांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, संपर्क तुटल्याने पोलिसांसमोरील चिंता वाढली आहे.

एकाच आठवड्यात दुसरी घटना

ही घटना ताजी असतानाच, यापूर्वी 20 ऑगस्ट रोजी गौतम गायकवाड नावाचा 24 वर्षीय तरुण सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता झाला होता. पाच दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतर तो 24 ऑगस्ट रोजी जिवंत आढळला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याच्यासोबत नेमके काय घडले याबाबत तो शुद्धीवर आल्यावरच खुलासा होईल. मात्र, एकाच आठवड्यातील या दुसऱ्या घटनेने सिंहगडावरील सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

सोशल मीडियावर चिंतेचे वातावरण

पाच मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनेने पुणे शहर हादरले आहे. सोशल मीडियावर नागरिकांकडून चिंता व्यक्त होत असून, ही मुलं कशी हरवली आणि त्यांच्यासोबत नेमके काय घडले याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पोलिसांनी शोधकार्य तीव्र केले असून, लवकरात लवकर मुलांचा शोध लागावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!