Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Manoj Jarange : मनोज जरांगे आजपासून पाणी पिणार नाहीत, डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिला गंभीर इशारा

Manoj Jarange : मनोज जरांगे आजपासून पाणी पिणार नाहीत, डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिला गंभीर इशारा

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण चौथ्या दिवसात प्रवेश करत आहे. आज, सोमवार, १ सप्टेंबर २०२५ पासून जरांगे यांनी पाणी पिणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी पत्रकार परिषदेत त्यांनी ही मोठी घोषणा केली. यामुळे मराठा आरक्षण आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. डॉक्टरांच्या पथकाने जरांगे यांची तपासणी केली असता, त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी असल्याचं निदान झालं आहे. पाणी सोडल्यास त्यांची प्रकृती आणखी खालावण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

जरांगे यांची ताब्यात खालावली, डॉक्टरांचा इशारा

डॉक्टरांच्या पथकाने जरांगे यांची रविवारी तपासणी केली. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी केवळ ७० च्या आसपास आहे, जी अत्यंत कमी आहे. डॉक्टरांनी त्यांना जास्त पाणी आणि ओआरएस घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, जरांगे यांनी आजपासून पाणी त्यागण्याचा निर्णय घेतला आहे. “पाणी सोडल्यास त्यांची प्रकृती गंभीर होऊ शकते,” असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. कर्नाटकातील बेळगाव येथील सकल मराठा आणि मराठी क्रांती सीमा भाग मोर्चा संघटनेने मूक मोर्चा काढून जरांगे यांना पाठिंबा दिला. या मोर्चातून हजारो मराठा बांधव मुंबईत आझाद मैदानावर पोहोचले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून आंदोलकांना पावसामुळे आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अडचणींचा सामना करावा लागला आहे. अनेक आंदोलकांना व्हायरल ताप, पायांना चिखल्या आणि ओल्या कपड्यांमुळे त्वचा विकार जाणवत आहेत. यावर डॉक्टरांचं पथक उपचार करत आहे. राज्यभरातून मराठा बांधवांसाठी माता-भगिनींनी भाकरी, ठेचा, बिस्किटे, पाण्याच्या बाटल्या आणि कडधान्य यासारख्या जीवनावश्यक वस्तू पाठवल्या आहेत, जेणेकरून आंदोलकांना उपासमारीला सामोरं जावं लागू नये.

मनोज जरांगे यांची मागणी काय?

मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून १०% आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत आहेत. त्यांनी सरकारकडे ५८ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी असल्याचा दावा केला आहे. मात्र, सरकारने याबाबत कायदेशीर मत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे, परंतु ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास कायदेशीर अडचणी असल्याचं स्पष्ट केलं आहे

जरांगे यांनी “हा अंतिम लढा आहे, एकतर विजयी यात्रा निघेल नाहीतर अंत्ययात्रा,” असं भावनिक आवाहन मराठा समाजाला केलं आहे. त्यांनी सरकारवर मूलभूत सुविधा न देण्याचा आणि आंदोलकांना त्रास देण्याचा आरोप केला आहे. आझाद मैदान आणि परिसरात हजारो आंदोलकांच्या उपस्थितीमुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई पोलिसांनी वाहनचालकांना सकाळच्या वेळी वाहतूक कोंडीचा इशारा दिला आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!