Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Laxman Hake Car Attack: लक्ष्मण हाकेंच्या कारवर जमावाकडून हल्ला; पाथर्डी तालुक्यातील आरनगावात घडली घटना

Laxman Hake Car Attack: लक्ष्मण हाकेंच्या कारवर जमावाकडून हल्ला; पाथर्डी तालुक्यातील आरनगावात घडली घटना

Laxman Hake Car Attack: ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अज्ञात तरुणांनी केलेल्या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आरनगाव बाह्यवळण रस्त्यालगत घडला. हाके आज सकाळी दैत्य नांदूर (ता. पाथर्डी) येथे होणाऱ्या ओबीसी एल्गार सभेसाठी जात होते. प्रवासादरम्यान ते अहिल्यानगरजवळ नाश्ता करण्यासाठी थांबले. त्यानंतर प्रवास सुरू होताच आरनगावजवळ काही अज्ञात तरुणांनी त्यांचे वाहन अडवून काठ्यांनी हल्ला केला.

या हल्ल्यात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून काचा फोडण्यात आल्या आहेत. मात्र, लक्ष्मण हाके यांना कोणतीही शारीरिक इजा झालेली नाही, अशी माहिती समोर आली आहे. घटनेनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा – ‘यापुढे आंदोलनात असेल किंवा नसेनही…;’ लक्ष्मण हाकेंच्या भावनिक पोस्टनंतर राजकीय वर्तुळात खळबळ

दरम्यान, हाके यांनी नुकतीच फेसबुकवर भावनिक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी स्पष्ट केले होते की, ‘मी प्रामाणिकपणे ओबीसी भटक्या समाजाच्या हक्कांसाठी लढतोय. मोठे स्टेज, बॅनर किंवा पैसा नसतानाही लोकांनी मला पाठींबा दिला. पण या संघर्षात शत्रूंची संख्याही वाढत गेली आणि हल्ले होत राहिले. आता मात्र सहन होत नाही. उद्या दैत्य नांदूर येथे होणाऱ्या ओबीसी मेळाव्यानंतर माझी भूमिका स्पष्ट करेन.’

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!