Today गुरूवार, 28th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Chandrapur Update : चंद्रपूरचे तहसीलदार व नायब तहसीलदार निलंबित, शेतकरी विषप्राशन प्रकरणात मोठी कारवाई

Chandrapur Update : चंद्रपूरचे तहसीलदार व नायब तहसीलदार निलंबित, शेतकरी विषप्राशन प्रकरणात मोठी कारवाई

चंद्रपूर : जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील कुरोडा येथील शेती जमिनीशी संबंधित वादात न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी न करण्याच्या कसुरीमुळे दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबनाची झळ बसली आहे. भद्रावती तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांना महाराष्ट्र शासनाने निलंबित केले असून, या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू झाली आहे. शासनाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी ३ ऑक्टोबर २०२५ रोजी हे आदेश जारी केले.

या घटनेचे मूळ कारण अर्जदार परमेश्वर विश्वनाथ मेश्राम (वय ५५ वर्षे, रहिवासी मोरवा गाव, भद्रावती) यांच्या शेतजमिनीचा वाद आहे. मेश्राम यांनी २०१५ मध्ये कुरोडा येथील सर्वे नंबर ११२ वरील वारसागत शेतजमिनीच्या अभिलेखात वारसांची नावे नोंदविण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला असून, त्यानुसार जमिनीचा म्यूटेशन (नोंदणी बदल) करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तहसील कार्यालयाकडून हा आदेश अंमलात आणण्यात जाणीवपूर्वक विलंब आणि दुर्लक्ष करण्यात आले, ज्यामुळे मेश्राम यांना वर्षानुवर्षे न्याय मिळाला नाही.

निराश होऊन मेश्राम यांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी भद्रावती तहसील कार्यालयातच विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाल्याने प्रथम भद्रावती ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर चंद्रपूर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर तीव्र उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या घटनेमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचार आणि दुर्लक्षाच्या मुद्द्यावर संताप व्यक्त होत असून, शेतकरी संघटना आणि स्थानिक नागरिकांनी तहसील प्रशासनाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. शासनाने या मागणीला प्रतिसाद देत तत्काळ निलंबनाची कारवाई केली असली, तरी या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची अपेक्षा आहे. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महसूल प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचे आश्वासन दिले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!