Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडाचा गुपचूप साखपूडा! पुढच्या वर्षी अडकणार लग्नबंधनात

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडाचा गुपचूप साखपूडा! पुढच्या वर्षी अडकणार लग्नबंधनात

Rashmika Mandanna Engagement: दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वात चर्चित आणि प्रिय जोडपे रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या दोघांनी कधीच उघडपणे त्यांच्या प्रेमाची कबुली दिली नसली तरी, त्यांचे नाते सर्वांपासून लपलेले नाही. कधी ते एकत्र सुट्टीवर दिसतात, तर कधी एकमेकांचे कपडे घालून चर्चेत येतात. आता मात्र त्यांच्या नात्याने एक नवीन टप्पा गाठल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या अहवालांनुसार, रश्मिका आणि विजय यांनी एका खासगी समारंभात साखरपुडा केला आहे. या कार्यक्रमाला फक्त कुटुंबीय आणि अगदी जवळचे मित्र उपस्थित होते. कोणताही गाजावाजा न करता हा समारंभ पार पडला असल्याने चाहत्यांमध्ये आनंद आणि उत्सुकता दोन्ही वाढली आहे.

लग्नाची तारीखही ठरली?

केवळ साखरपुडाच नाही, तर सूत्रांच्या माहितीनुसार या जोडप्याने त्यांच्या लग्नाची तारीखही निश्चित केली आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळा होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अधिकृत पुष्टी अद्याप नाही

मात्र, अद्याप रश्मिका किंवा विजय या दोघांकडूनही कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही. त्यामुळे जोपर्यंत ते स्वतः याबद्दल प्रतिक्रिया देत नाहीत, तोपर्यंत ही बातमी अफवा मानली जात आहे. रश्मिका आणि विजयची जवळीक 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या गीता गोविंदम या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वाढली. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भुरळ घालणारी ठरली. त्यानंतर 2019 मध्ये आलेल्या ‘डियर कॉम्रेड’ ने त्यांच्या नात्याच्या चर्चेला आणखी बळ दिले. तेव्हापासून चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याबद्दल उत्सुकता कायम आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!