पुणे : मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी १० नोव्हेंबर २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयात लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्म श्रेणी) यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्म श्रेणी).
– एकूण रिक्त पदे : 30 पदे.
– वयोमर्यादा : खुला : २१ वर्षे – ३८ वर्षे, मागासवर्गीय: २१ वर्षे – ४३ वर्षे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : १० नोव्हेंबर २०२५.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://bombayhighcourt.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


