Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

एआयमुळे नोकऱ्यांच्या जास्त संधी !

एआयमुळे नोकऱ्यांच्या जास्त संधी !

नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंटिलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक परिवर्तनकारी तंत्रज्ञान शक्ती असून, ती उद्योगांना आणि दैनंदिन जीवनाला आकार देईल, ज्यामुळे कमी होणाऱ्या नोकऱ्यांपेक्षा जास्त संधी निर्माण होतील, असे मत जागतिक व्यावसायिक सेवा पुरवठादार दक्षिण आशिया प्रदेशातील मुख्य कार्यकारी अधिकारी रोमल शेट्टी यांनी व्यक्त केले.

अधिक प्रगत टप्प्यात, एआय एक अतिशय उपयुक्त आणि आवश्यक साधन म्हणून काम करू शकते आणि ते मानवी प्रतिभेची जागा घेण्याऐवजी पूरक ठरते, असेही त्या म्हणाल्या. एमआयटीच्या मीडिया लॅबमधील अलीकडच्या संशोधन निष्कर्षांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे विधान महत्त्वाचे आहे. या अभ्यासातून एआय टूल्स कार्यक्षमता सुधारू शकतात; परंतु जे लोक जनरेटिव्ह एआयवर जास्त अवलंबून असतात त्यांची स्मरणशक्ती कालांतराने कमी होत जाते असे दिसून आले.

एआयचा नोकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांबद्दल त्या म्हणाल्या की, एआयच्या आगमनामुळे काही नोकऱ्या नष्ट होऊ शकतात; परंतु इतिहास दाखवतो की नवीन भूमिका आणि व्यवसाय मॉडेल उदयास येतील. प्रत्येक गमावलेल्या नोकरीमागे सुमारे दोन नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. जुन्या विशिष्ट नोकऱ्या कदाचित नाहीशा होतील, परंतु नवीन नोकऱ्या निर्माण होतील, असे ते म्हणाले. एआयमध्ये नीतिमत्ता, तत्त्वे आणि प्रशासनाचा समावेश करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना शेट्टी यांनी या क्षेत्रांकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शिक्षणात एआयच्या समावेशावर काही मर्यादा घालण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!