मुंबई : भारताचे ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्यासाठी स्टार्टअप आणि एमएसई इकोसिस्टममध्ये सीजीटीएमएसई महत्त्वाची भूमिका बजावत आहे. एमएसएमई क्षेत्राला आर्थिक आणि ज्ञानात्मक बळ देण्यासाठी रायझिंग टीव्हीसोबतची ही भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे, असे मत सीजीटीएमएसईच्या सहाय्यक व्यवस्थापक श्वेता शेट्टी यांनी व्यक्त केले.
भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) प्रगतीसाठी वचनबद्धता व्यक्त करत, रायझिंग टीव्ही नेटवर्कने डिजिटल रेनसाँस समिट २०२५चे आयोजन केले. एमएसएमई दिनाच्या निमित्ताने झालेला हा समिट, क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अॅण्ड स्मॉल एंटरप्रायझेस (सीजीटीएमएसई), आयडीबीआय बँक, इन्व्हेस्टर एआय आणि सिरिल अमरचंद मंगलदास यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. या समिटद्वारे एमएसएमई क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक मार्गदर्शन, आर्थिक संधी आणि नेटवर्किंगचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला. सुमारे ११ कोटी लोकांना रोजगार देणाऱ्या आणि भारताच्या जीडीपीचा सुमारे ३० टक्के वाटा उचलणाऱ्या या क्षेत्राच्या विकासासाठी अनेक उद्योजक, गुंतवणूकदार, कायदेविषयक तज्ज्ञ आणि आर्थिक संस्था एकत्र आल्या आहेत.


