मुंबई : आदित्य धर यांचा स्पाय-थ्रिलर ‘धुरंधर’ सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. प्रेक्षक, समीक्षक आणि सेलिब्रिटी हेदेखील या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे. आता बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही ‘धुरंधर’चे कौतुक केले आहे. त्यांनी ‘धुरंधर’ हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा चित्रपट असून, इंडस्ट्रीमध्ये एक मोठी झेप असल्याचे म्हटले आहे.
राम गोपाल वर्मा यांच्या कौतुकाने आनंदित होऊन दिग्दर्शक आदित्य धर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. राम गोपाल वर्मा यांनी ‘धुरंधर’चे कौतुक केले. इन्स्टाग्रामवरील त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “मला वाटते की आदित्य धरने एकट्याने भारतीय चित्रपटसृष्टीचे भविष्य बदलले आहे, मग ते उत्तर भारत असो किंवा दक्षिण भारत. कारण धुरंधर हा केवळ एक चित्रपट नाही, तर एक अभूतपूर्व झेप आहे. धुरंधर यापूर्वी कधीही न पाहिलेला दृष्टिकोन सादर करतो. आदित्य धर फक्त सीन दिग्दर्शित करत नाही, तर कॅरेक्टर आणि प्रेक्षक दोघांच्याही मनात काय आहे ते दाखवत आहे”.
धुरंधर हा चित्रपट तुमचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत नाही, तर तो आकर्षित करतो. पहिल्याच शॉटपासून चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे. तर पडद्यावर घडणाऱ्या घटनांचा एक भाग आहेत. राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटाच्या अॅक्शन, लेखन आणि अभिनयाचे कौतुक केले.


