Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Raja Shivaji Collection : ‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर दुसऱ्याही दिवशी दणदणीत कमाई; दोन दिवसांत नवा विक्रम

Raja Shivaji Collection : ‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर दुसऱ्याही दिवशी दणदणीत कमाई; दोन दिवसांत नवा विक्रम

Raja Shivaji Collection : राजा शिवाजी या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड कायम असून, दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने दमदार कमाई करत नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि जिनिलिया देशमुख निर्मित या चित्रपटाला देशभरातून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या दिवशी मराठी आवृत्तीने १९८० शोमधून ७.१५ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या दिवशीच्या ८ कोटी रुपयांच्या तुलनेत ही कमाई किंचित कमी असली, तरी ५७ टक्के ऑक्युपन्सीसह चित्रपटाने दमदार पकड कायम ठेवली आहे. त्यामुळे मराठी आवृत्तीची दोन दिवसांची एकूण कमाई १५.१५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

हिंदी आवृत्तीने पहिल्या दिवशी ३.३५ कोटी, तर दुसऱ्या दिवशी ३.४० कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे दुसऱ्या दिवसाचे एकूण कलेक्शन १०.५५ कोटी रुपयांवर पोहोचले.

मराठी आणि हिंदी या दोन्ही आवृत्त्यांची एकत्रित भारतातील नेट कमाई दोन दिवसांत तब्बल २१.९० कोटी रुपये झाली आहे. तर ग्रॉस कलेक्शनचा आकडा २६.०६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

चित्रपटातील भव्य स्टारकास्टही प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरत आहे. यातरितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, फरदीन खान, भाग्यश्री, सचिन खेडेकर, अमोल गुप्ते आणि जितेंद्र जोशी यांच्यासह यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!