Today शनिवार, 2nd मे 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

धक्कादायक! मुंबईत ऑडिशनच्या बहाण्याने माथेफिरुने मुलांना ओलीस ठेवलं; नेमकं काय घडलं? वाचा

धक्कादायक! मुंबईत ऑडिशनच्या बहाण्याने माथेफिरुने मुलांना ओलीस ठेवलं; नेमकं काय घडलं? वाचा

मुंबई: मुंबईत आज भयानक प्रकार उघडकीस आला आहे. अभिनय शिकवण्याच्या नावाखाली मुलांना ओलीस ठेवण्याची धक्कादायक घटना आर ए स्टुडिओमध्ये घडली आहे. या स्टुडिओत गेल्या काही दिवसांपासून ऑडिशन आणि शूटिंग सुरू होते. मात्र, गुरुवारी सकाळी अचानक एका यूट्यूबरने स्टुडिओतील १५ ते २० मुलांना खोलीत बंद करून ठेवले, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सर्व मुलांची सुरक्षित सुटका केली. तसेच आरोपीला ताब्यात घेतले. मुलांना ओलीस ठेवणाऱ्याचं नाव रोहित आर्य असं सांगितलं जात आहे. तो स्वतःचा यूट्यूब चॅनल चालवतो आणि काही दिवसांपासून मानसिक तणावात होता, अशी माहिती मिळाली आहे.

रोहित आर्यने सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून म्हटलं, ‘मी दहशतवादी नाही, माझ्या काही मागण्या आहेत. मला संवाद साधायचा आहे आणि काही लोकांना प्रश्न विचारायचे आहेत. त्याने सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी मुलांना ओलीस ठेवण्याचं पाऊल उचलल्याचंही सांगितलं.

हेही वाचा –ताम्हिणी घाटात दरड कोसळली! कारच्या सनरुफमधून दगड डोक्यात पडल्याने महिलेचा जागीचं मृत्यू

या संपूर्ण घटनेनंतर आर ए स्टुडिओ परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी सावधगिरीने कारवाई करत कोणतीही जीवितहानी होऊ दिली नाही. सध्या आरोपी रोहित आर्यला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!