Today सोमवार, 27th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तोपर्यंत निवडणुका नाही! उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांची एकमुखी भूमिका

तोपर्यंत निवडणुका नाही! उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांची एकमुखी भूमिका

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मनसेप्रमुख राज ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच इतर विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत १ नोव्हेंबर रोजी होणारा मोर्चा आणि बोगस मतदार याद्यांवरील गोंधळ या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

‘मतदार यादीतील घोळ दूर करा, अन्यथा निवडणुका नाही’

बैठकीत सर्व विरोधी पक्ष एकवटले आणि ठाम भूमिका घेतली की, ‘जोपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने बोगस आणि दुबार मतदार यादीतून वगळले नाहीत, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत.’ विरोधकांनी स्पष्ट इशारा दिला की, मतदार यादीतील गोंधळ दुरुस्त झाल्याशिवाय निवडणुकांना विरोध सुरूच राहील. आयोगाने टप्प्याटप्प्याने कार्यक्रम जाहीर केला असला तरी, निवडणुका पारदर्शक झाल्याशिवाय जनतेच्या विश्वासाला तडा जाईल, अशी चिंता विरोधकांनी व्यक्त केली.

१ नोव्हेंबरला ‘सत्याचा मोर्चा’

शिवसेना नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, १ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रीटवरून मोर्चा सुरू होईल, आणि मेट्रो सिनेमा मार्गे महापालिका मुख्यालयापर्यंत जाणार आहे. परब म्हणाले, हा मोर्चा सत्य जनतेसमोर आणण्यासाठी आहे. मतदार याद्यांतील अन्याय आणि मतचोरीविरोधात आम्ही लढत आहोत. मोर्चानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. तथापी, शरद पवार मोर्चात सहभागी होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हिव्हिपॅट नाहीच; निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं

सत्ताधाऱ्यांविरुद्ध संयुक्त रणनिती

बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड, सचिन सावंत, नितीन सरदेसाई, जयंत पाटील आणि इतर नेत्यांमध्ये पुढील रणनीतीवर चर्चा झाली. १ नोव्हेंबरच्या मोर्चानंतर सर्व पक्ष एकत्र येऊन पुढील टप्प्याचे आंदोलन जाहीर करणार आहेत. दरम्यान, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विरोधकांच्या मोर्चावर टीका करताना म्हटले, हा मोर्चा म्हणजे सत्तेसाठी व्याकूळ झालेल्यांचा प्रयत्न आहे. फॅशन स्ट्रीटवरून सुरू होणारा हा मोर्चा म्हणजे राजकीय फेरीवाल्यांचा जमाव आहे. ‘इथे बस, तिथे बस’ असं राजकारण सुरू आहे, अशा शब्दांत दरेकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!