Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

गौतमी पाटील आणि अभिजीत सावंत आले एकत्र; मोठ्या प्रोजेक्टवर काम सुरू? इंस्टाग्रामवरील पोस्टने वेधलं लक्ष

गौतमी पाटील आणि अभिजीत सावंत आले एकत्र; मोठ्या प्रोजेक्टवर काम सुरू? इंस्टाग्रामवरील पोस्टने वेधलं लक्ष

Gautami Patil Abhijeet Sawant: इंडियन ऑयडॉलच्या पहिल्या पर्वाचा विजेता गायक अभिजीत सावंतनं (Abhijeet Sawant) नुकतीच संगीत विश्वातली आपली 20 वर्ष पूर्ण केली आहेत. गेल्याच वर्षी तो बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात दिसलेला. तेव्हापासून अभिजीतच्या फॅनफॉलोइंगमध्ये मोठी वाढ झालीय. तो सातत्यानं नवनवे प्रोजेक्ट करताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी त्यानं अल्बम्स रिलीज केलेत, ज्याला चाहत्यांची मोठी प्रसिद्धी मिळालेली. अशातच आता अभिजीत सावंत, सबसे कातील गौतमी पाटीलसोबत (Gautami Patil) दिसणार असल्याच्या चर्चा आहेत.

नेहमीच या ना त्या कारणानं चर्चेत असणारी नृत्यांगणा गौतमी पाटील महाराष्ट्रभरात स्टेज शो करत असते. याव्यतिरिक्त तिनं काही सिनेमांमध्येही काम केलंय. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या ‘प्रेमाची गोष्ट 2’ सिनेमात गौतमी पाटीलचं आयटम सॉन्ग होतं. अशातच आता स्टेज शो, आयटम सॉन्ग करणारी गौतमी पाटील थेट ‘इंडियन आयडॉलफेम अभिजीत सावंतसोबत नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यासाठी कारण ठरलीय, गौतमी पाटीलची इन्स्टाग्राम पोस्ट.

गौतमीची इन्स्टा पोस्ट चर्चेत

गौतमी पाटीलनं सोशल मीडियावर गायक अभिजीत सावंतसोबतचा फोटो शेअर केलाय. तसेच, त्या फोटोलाNEW’ असं कॅप्शन दिलं आहे. अशातच आता दोघेही सोबत काम करणार का? नवी प्रोजेक्टवर काम करतायत का? की आणखी काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे, अशा चर्चा रंगल्या आहेत. हसतानाच्या इमोजीसह पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये गौतमी पाटील आणि अभिजीत सावंत खळखळून हसताना दिसत आहेत.

‘इंडियन आयडॉलफेम अभिजीत सावंतनं गेल्या अनेक दिवसात अनेक गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आणली. त्यात ‘प्रेमरंग सनेडो‘, ‘चाल तुरू तुरू‘ यांसारख्या गाण्यांना जबरदस्त व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. त्यापूर्वी अभिजीत Bigg Boss Marathi Season 5 मुळे चर्चेत आलेला. त्यावेळी अवघ्या महाराष्ट्रानं त्याला पाठींबा दिलेला. तसेच, ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्येही अभिजीत झळकला होता. तर, गौतमी पाटीलबाबत सांगायचं झालं तर, अलिकडेच रिलीज झालेल्या ‘प्रेमाची गोष्ट 2’मधील ‘दिसला गं बाई दिसला 2.0′ गाण्यात गौतमी पाटील दिसलेली. या गाण्यावरुन तिला ट्रोल करण्यात आलेलं. तसेच, ‘सोनचाफा‘, ‘आई गोंधळाला येअशा म्युझिक अल्बम्समध्येही ती झळकलेली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!