Today गुरूवार, 28th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘आमची सत्ता आल्यानंतर सर्वांची चौकशी लावू…’; अविनाश जाधव यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

‘आमची सत्ता आल्यानंतर सर्वांची चौकशी लावू…’; अविनाश जाधव यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

ठाणे: ठाण्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी भविष्यातील व्यापक आंदोलने आणि वाहन कोंडीविरुद्ध मोर्च्यांचा इशारा देण्यात आला. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सत्ताधारी नेत्यांवर रोखठोक टीका करत सरकारविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन केले. अविनाश जाधव यांनी म्हटलं की, ‘आम्ही बाळासाहेबांची ओरिजनल फौज आहोत, आता पैसा टिकणार नाही. ठाण्यात दहशतीचे वातावरण असून दहशतीला घाबरून अनेकजण तिकडे आहेत, आम्ही एकत्रपणे लढू, आम्ही घाबरणार नाही. ठाणेकरांसाठी आम्ही लढणार, असं म्हणत अविनाश जाधव यांनी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-मनसे युतीचे संकेत दिले.

दरम्यान, यावेळी अविनाश जाधव म्हणाले की, 4 हजार कोटींच्या महापालिकेला या लोकांनी बरबाद केले, या लोकांनी पालिका लुटून खाल्ली. ज्यावेळी आमची सत्ता येईल, तेंव्हा सर्वांची चौकशी लाऊन यांना आत टाकू, असा कडक इशाराही जाधव यांनी यावेळी सत्ताधारी नेत्यांना दिला.

हेही वाचा – शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ..! कर्जमाफीचा नाद असल्याने आम्ही निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो, सहकारमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

तथापी, शिवसेनेचे माजी आमदार राजन विचारे यांनीही महापालिकेतील आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासनिक दुर्लक्षावर खळबळजनक आरोप केले. विचारे म्हणाले की २०१७ ते २०२५ या कालखंडात महापालिकेत निवडणुका न घेतल्यामुळे जबाबदाऱ्या पाळल्या गेल्या नाहीत. पालिकेच्या खजिनीत कोट्यवधींचा विसर आहे आणि विविध निधींचा वापर अस्पष्ट आहे. त्यांनी अनधिकृत बांधकामे, अधिकार्‍यांना अनावश्यक बढती देणे आणि पाण्याच्या टँकरच्या लॉबीप्रकरणीही प्रश्न उपस्थित केले. दोन्ही पक्षांनी स्थानिक नागरिकांना सोमवारी होणाऱ्या ‘धडक मोर्चा’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!