Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

वाल्मिक कराडवर खंडणी, हत्या अ‍ॅट्रॉसिटी; सीआयडीकडून मकोका न्यायालयात आरोपपत्र दाखल

वाल्मिक कराडवर खंडणी, हत्या अ‍ॅट्रॉसिटी; सीआयडीकडून मकोका न्यायालयात आरोपपत्र दाखल

बीड: जिल्ह्यातील मस्साजोगचे (ता. केज) सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडीच्या पथकाने गुरुवारी सर्व आठ आरोपींविरुद्ध जवळपास १४०० पानांचे आरोपपत्र बीड येथील विशेष मकोका न्यायालयात दाखल केले. यावेळी एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली, सीआयडीचे डीवायएसपी अनिल गुजर, तसेच इतर अधिकारी, सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांची उपस्थिती होती. दरम्यान, केज ठाण्यात याच प्रकरणाशी संबंधित खंडणी आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याचेही दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.

केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणापासून अपहरणाच्या प्रकरणापर्यंत तपास सीआयडीच्या हाती होता. तर देशमुख हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे आहे. आरोपी वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे यांच्याविरोधात हे आरोपपत्र आहे. यातील कृष्णा आंधळे हा फरार आहे. बीडच्या विशेष मकोका न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे हा खटला चालवणार आहेत.

तपास यंत्रणेने खूप मेहनत घेतली धनंजय देशमुख

सीआयडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडी व एसआयटीची स्थापना सरकारने केलेली आहे. या तपास यंत्रणेचे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र खूप मेहनत करून यातील पुरावे शोधले. त्यामुळे हे सर्व तपासाचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. आता आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!