Today बुधवार, 11th फेब्रुवारी 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

लातूर: लातूर – औसा रोडवर बेलकुंडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमा (दि. २६) दुपारी पाच वाजेच्या दरम्यान झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार देशमुख हे औसाकडे चारचाकी गाडीतून येत होते. बेलकुंडीजवळ उड्डाणपुलाच्या जवळ आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी उलटली. या अपघातात देशमुख गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.

आर. टी. देशमुख हे माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या निधनाने एक अनुभवी व प्रगल्भ नेता हरपल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

उड्डाणपुलाच्या दुभाजकाचे कठडे गाडीने तोडले

चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर देशमुख यांची गाडी रस्त्याच्या बाजूला उलटली. गाडीने दोन ते तीन पलट्या घेतल्याची माहिती मिळत आहे. चालक आणि माजी आमदार देशमुख दोघेही गंभीर जखमी झाले. त्यावेळी रस्त्यावरील वाहनधारकांनी धाव घेत दोघांना गाडीबाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या देशमुख यांना तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रस्त्यात असताना त्यांचा मृत्यू झाला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!