बीड : मस्साजोग येथील पवनचक्की कंपनीकडे दोन कोटी रुपयांच्या खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात अटक असलेला आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत एसआयटीतील स्थानिक गुन्हे शाखेतील एका अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल झाला होता. संबंधित पोलीस अधिकाऱ्यासह दोन अंमलदारांचे एसआयटीतील काम थांबवल्याची माहिती आता समोर आली आहे. दरम्यान, संबंधितांना एसआयटीकडे वर्ग केले नव्हते, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
याबाबत शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी ‘एक्स’ समाजमाध्यमाद्वारे दिली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशीसाठी उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी नियुक्ती करण्यात आली होती. यातील एका अधिकाऱ्यासह दोन कर्मचाऱ्यांना थांबवले आहे.


