मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही बीड हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. देशमुख हत्या प्रकरणाची पूर्ण चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. चौकशीत जो दोषी सापडेल, त्या सर्वांवर कारवाई करू, असे फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे चौकशीआधी मुंडेंचा राजीनामा का मागत आहात ? चौकशीतून काही आले का? तुमच्याकडे काही माहिती, पुरावे असतील तर पोलिसांकडे द्या. जोपर्यंत चौकशीतून काही येत नाही, तोपर्यंत राजीनामा मागणे चुकीचे आहे.
मलाही तेलगी प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.” पुढे मी निर्दोष निघालो. सुप्रीम कोर्टानेही त्यावर शिक्कामोर्तब केले. पुढे मला पवारांनी पुन्हा मंत्री केलें. पण मला जे काही भोगावे लागले, त्याचा मला अनुभव आहे, असे सांगत छगन भुजबळ यांनी मुंडेंची बाजू घेतली.


