Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

संतोष हत्या देशमुख प्रकरणातील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी चव्हाट्यावर

संतोष हत्या देशमुख प्रकरणातील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी चव्हाट्यावर

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेतील आरोपींवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सीआयडी पोलीस तपासात समोर आले आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुलेविरुद्ध १९ गुन्ह्यांची नोंद आहे. सीआयडी पोलीस कोठडीत आता त्याच्यासह इतर आरोपींची हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात कसून चौकशी सुरू असताना आता या आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे व विष्णू चाटे यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल आहे. सध्या कृष्णा आंधळे वगळता इतर सर्व सीआयडी कोठडीत आरोपी आहेत. वाल्मिक कराड पुण्यात सीआयडी कार्यालयात शरण आला, तर इतर आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी विविध ठिकाणाहून गजाआड केले आहे. याच प्रकरणात संतोष देशमुख यांचे लोकेशन दिल्याचा आरोप असलेल्या संशयित सिद्धार्थ सोनवणे यालाही कल्याणमधून अटक केल्यानंतर त्याची आता सीआयडी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

दरम्यान, अटकेतील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे. सुदर्शन घुलेविरुद्ध १९ गुन्हे दाखल आहेत, तर वाल्मिक कराडविरुद्ध १५, कृष्णा आंधळे ६, सुधीर सांगळे व विष्णू चाटे यांच्याविरुद्ध प्रत्येकी ३, तसेच महेश केदारविरुद्ध ६, प्रतीक घुलेविरुद्ध ५ व जयराम चाटेविरुद्ध ३ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती तपासातून पुढे आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सीआयडी कोठडीत तपास यंत्रणाकडून गुन्ह्याच्या अनुषंगाने या आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!