Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Weather : उकाड्याला ब्रेक! ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा यलो अलर्ट

Maharashtra Weather : उकाड्याला ब्रेक! ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा यलो अलर्ट

Maharashtra Weather : राज्यातील प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भात पूर्वमोसमी पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मागील २४ तासांत विदर्भात तापमानाने विक्रमी पातळी गाठली होती. अमरावती येथे राज्यातील सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. अकोला आणि वर्धा येथे ४६ अंश, तर नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर येथे तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले होते. या तीव्र उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

दरम्यान, खानदेश आणि मराठवाड्यातही उष्णतेचा तडाखा कायम होता. धुळे, जळगाव, परभणी आणि वाशीम येथे तापमान ४४ अंशांपेक्षा जास्त नोंदले गेले.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारेही वाहू शकतात.

या बदलत्या हवामानामुळे तापमानात किंचित घट होईल, मात्र राज्यातील इतर भागांत उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून बचावासाठी पुरेसे पाणी पिणे, दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळणे आणि आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!