Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

प्रलंबित जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणे मार्गी लागणार; २५ जिल्ह्यांत पडताळणी समित्यांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती

प्रलंबित जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणे मार्गी लागणार; २५ जिल्ह्यांत पडताळणी समित्यांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती

मुंबई: हजारो विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणे प्रलंबित असल्याने आणि नवे शैक्षणिक वर्ष लवकरच सुरू होणार असल्याने जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्षाची २५ रिक्त पदे भरण्यात आली आहेत. समाज कल्याण विभागाच्या सर्व ३५ जिल्ह्यांत जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत असतात. मात्र, अनेक अध्यक्षांची अतिरिक्त जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) पदावर निवड झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून ही पदे रिक्त असल्याने हजारो विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र पडताळणी अडकून पडली होती. अखेर शासनाने २५ रिक्त पदे भरली आहेत.

इयत्ता १२ वीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दलित, आदिवासी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते. जिल्हा जात पडताळणी समिती असते. या समितीच्या अध्यक्षपदी महसूल विभागातील अतिरिक्त जिल्हाधिकारी तसेच सामाजिक, न्याय विभागातील मंत्रालयीन सहसचिव संवर्गातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. यातील ३० अध्यक्षांची पदे महसूल विभागाद्वारे तर सहा पदे सामाजिक न्याय विभागाद्वारे भरली जातात, दरम्यान, या समित्यांवर अध्यक्षपदी कार्यरत असलेल्या १४ अधिकाऱ्यांपैकी दहा अतिरिक्त प्रशासन सेवेत म्हणून पदोन्नती झाली आहे.

संबंधित अधिकारी भारतीय प्रशासन सेवेत दाखल झाल्याने समित्यांचे अध्यक्षपद सोडावे लागले. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून समितींच्या अध्यक्षपदाच्या जागा रिक्त होत्या. पुढील महिन्यात बारावीचे निकाल लागतील. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी लगबग सुरू होईल. अनेक जिल्ह्यांतील जात पडताळणी समितीवर अध्यक्ष नसल्याने अनेक मुलांची प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यातच २५ अधिकारी नुकतेच रूजू झाले आहेत. महसूल विभागाच्या महसूल २५ फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अधिकाऱ्यांची समित्यांवरील रिक्त असलेल्या अध्यक्षपदावर पदस्थापना करण्यात आली आहे. आता ही हजारो प्रलंबित प्रकरणे येत्या दोन महिन्यांत मार्गी लावली जातील, असे सांगण्यात आले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!