रायगड : घुम (ता. म्हसळा, जि. रायगड) गावातील सातवीमध्ये शिकणाऱ्या गर्वांग दिनेश गायकर (१४) या मुलाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. गर्वांगच्या मृत्यूला माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. गर्वांग याला केसपुळी झाल्याने तो तापाने फणफणला होता. शनिवारी त्याला अचानक ताप भरल्याने रात्रीच्या सुमारास पुन्हा म्हसळा ग्रामीण रुग्णालयात भरती केले.
गर्वांग याला ताप जास्त प्रमाणात असल्याने डॉक्टरांनी सलाईन लाऊन त्याला स्टेबल केले होते आणि पुढील उपचारांसाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. गर्वांगचे उपचार न करणाऱ्या डॉक्टरवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.


