Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Shivsena MLA Prakash Surve : “मराठी माझी आई, मेली तरी चालेल” वादग्रस्त वक्तव्यावर शिंदे गटाच्या आमदाराची माफी; म्हणाले…

Shivsena MLA Prakash Surve : “मराठी माझी आई, मेली तरी चालेल” वादग्रस्त वक्तव्यावर शिंदे गटाच्या आमदाराची माफी; म्हणाले…

Shivsena MLA Prakash Surve : शिवसेना (शिंदे गट) चे आमदार प्रकाश सुर्वे यांनी एका कार्यक्रमात मराठी भाषेवरून वादग्रस्त विधान केले होते. “मराठी माझी आई आहे, तर उत्तर भारत माझी मावशी आहे. एकवेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी मरायला नको,” असे ते म्हणाले. यातून उत्तर भारतीय मतदारांचे प्रेम मराठीपेक्षा जास्त असल्याचे त्यांनी सूचित केले. या वक्तव्यामुळे राज्यभर संताप पसरला असून, विरोधी पक्षांनी तीव्र टीका केली.

त्यानंतर अखेर सुर्वे यांनी माफी मागितली आहे. ते म्हणाले, “मराठी आमची मायमाऊली आहे. काल अनावधानाने माझ्या तोंडून ते शब्द गेले. मी मराठीचा अपमान करणार नाही.”

नेमके वक्तव्य काय?

प्रकाश सुर्वे म्हणाले होते, “मी हे सांगू इच्छितो की मराठी माझी आई आहे, तर उत्तर भारत माझी मावशी आहे. एकवेळ आई मेली तरी चालेल. पण मावशी मरायला नको. कारण मावशीचं आपल्यावर जास्त प्रेम असतं. मला माझ्या आईपेक्षा जास्त प्रेम तुम्ही (उत्तर भारतीयांनी) दिलं आहे. माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी तुमचं प्रेम असंच ठेवा.”

मनसे नेते अमित ठाकरे यांची टीका

मनसे नेते अमित ठाकरे यांनी सुर्वेंवर संताप व्यक्त करताना म्हटले, “ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. एका आमदाराने असं वक्तव्य करणं ही त्यांची लाचारी आहे. ही गंभीर चूक आहे. अशा चुका यापुढे करू नका, एवढंच मी त्यांना सांगेन.”

अंबादास दानवेंचा टोला

शिवसेना (ठाकरे गट) चे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले, “प्रकाश सुर्वे यांना आईचं महत्त्व माहिती नसेल. मागे एका ब्रिजवर त्यांनी केलेला प्रकार सर्वांनी पाहिला होता. त्यांचं ते कर्तृत्व सगळ्यांनीच पाहिलं आहे. ही माणसं आपल्या आईचा सन्मान काय राखणार? असे पुत्र असतील तर त्यांचं व त्यांच्या पक्षाचं चांगलं कल्याण होईल.”

काँग्रेसचा फडणवीसांना खोचक टोला

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुर्वेंच्या वक्तव्याला देवेंद्र फडणवीसांच्या सरकारचे धोरण म्हणत टीका केली. ते म्हणाले, “प्रकाश सुर्वेंचं वक्तव्य हे फडणवीसांच्या सरकारचं धोरण आहे.

अलीकडच्या काळात फडणवीसांना पंतप्रधान होण्याची स्वप्नं पडत आहेत. ते दिवसाही अशी स्वप्नं पाहात आहेत. हिंदी भाषिकांमध्ये लोकप्रिय होण्यासाठी ते मराठीच्या छातीत खंजीर खुपसतायत. महाराष्ट्रातील तमाम जनतेने या घटनेकडे बारकाईने लक्ष देऊन मराठीच्या संवर्धनासाठी काम करावं.”

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!