Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘तो’ अपघात नव्हे खूनच..! चालकानेच घेतला बदला; हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हलर भीषण आग दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर…

‘तो’ अपघात नव्हे खूनच..! चालकानेच घेतला बदला; हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हलर भीषण आग दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर…

पुणे: हिंजवडीमध्ये बुधवारी (दि. २०) सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या बारा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागली. या अपघातात चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे.

दरम्यान, आता याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंजवडीमधील ही घटना अपघात नसल्याचे उघड झाले आहे. टेम्पो ट्रॅव्हलर चालकाने केमिकल आणून सीटखाली ठेवत भडका घडवून आणला. फेज १ मध्ये एकेरी वाहतूक असलेला रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली. त्यानंतर केमिकलचा भडका उडाला. भडका उडण्यापूर्वी चालक गाडीतून उतरला होता. त्याचा दिवाळीत पगार कापला होता. तसेच गाडीतील सहकारी कर्मचाऱ्यांनी त्रास दिला होता म्हणून त्याने हे सर्व घडवून आणल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जनार्दन हंबर्डीकर असे चालकाचे नाव आहे. त्याचा तिघांशी वाद होता, त्यांना संपवायचे म्हणून त्याने हा प्रकार केला.

नेमकं काय घडलं होतं?

बुधवारी सकाळी सुमारे आठ वाजता टेम्पो ट्रॅव्हलरला हिंजवडी फेज वनमध्ये निघाली असताना चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. ही बाब लक्षात आल्यानंतर चालक आणि समोरच्या सीटवरील कर्मचारी गाडीतून तात्काळ बाहेर पडले. मात्र, मागील दरवाजा उघडता न आल्याने मागच्या सीटवर बसलेल्या चार कर्मचाऱ्यांना गाडीतून बाहेर पडता आले नाही. त्यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!