Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सांगवीतून बेपत्ता झालेली मानसी घरातून थेट लोहगडावर गेली; ‘या’ गोष्टीमुळे तिने टोकाचा निर्णय घेत केला आयुष्याचा शेवट

सांगवीतून बेपत्ता झालेली मानसी घरातून थेट लोहगडावर गेली; ‘या’ गोष्टीमुळे तिने टोकाचा निर्णय घेत केला आयुष्याचा शेवट

पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी येथील बेपत्ता तरुणीचा मावळ तालुक्यातील लोहगड येथे किल्ल्याच्या पायथ्याशी मृतदेह आढळला. यामुळे पुण्यासह राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तिने नैराश्यातून गडावरून उडी मारत आपल्या आयुष्याचा शेवट केल्याचे आता समोर आले आहे. गेल्या वर्षी या तरुणीचे अपेन्डीक्सचं ऑपरेशन करण्यात आले होते. या आजारपणामुळे ती एलएलबीच्या तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेला बसू शकली नव्हती. यामुळे तिनेआपले जीवन संपवल्याचे उघड झाले आहे.

मानसी प्रशांत गोविंदपुरकर (वय 21, रा. सांगवी) असे मृतदेह आढळलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिचे मामा अगस्ती पुरुषोत्तम गोवर्धन (वय 48 वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. ४०३ रसाळ हाईटस्, सहयाद्री कॉलनी, पिंपळे गुरव) यांनी याबाबत फिर्याद दिली होती.

मानसी मंगळवारपासून (दि. 19) बेपत्ता होती. मंगळवारी सकाळी ती कॉलेजला जाण्यासाठी घरातून गेली. परंतु संध्याकाळ झाली, तरी ती घरी परतली नाही. तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या संपर्क होऊ शकला नाही. अखेर नातेवाईकांनी मानसी बेपत्ता झाल्याची तक्रार सांगवी पोलीस ठाण्यात दाखल केली.

नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मानसीच्या मैत्रिणींकडे देखील विचारपूस करून माहिती घेतली. परंतु, तिच्याबद्दल कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. शेवटी पोलिसांनी मानसीच्या तांत्रिक विश्लेषण करून तिच्या मोबाईलचे लोकेशन काढले. त्यावेळी तिचे शेवटीचे लोकेशन हे लोहगडावर असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी गडावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी लोहगडावर जातानाच्या तिकीट काउंटरवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मानसी दिसून आली. त्यामध्ये ती लोहगडावर जाताना तर दिसली, मात्र परत खाली येताना काही दिसली नाही. पोलीस, मानसीचे नातेवाईक आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी लोहगड परिसरात तिचा शोध घेण्यात आला. गडाच्या पायथ्याशी असलेल्या घेरेवाडीकडील बाजूला नवग्रह मंदिराच्या जवळ झाडाझुडपात तिचा मृतदेह आढळून आला.

त्यानंतर मानसीचा मृतदेह लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला. गेल्यावर्षी वर्षी तीचे अपेन्डीक्सचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे तिला एलएलबीच्या तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेला बसता आले नव्हते. यातून आलेल्या नैराश्यामुळे तिने आयुष्याचा शेवट केला असल्याचे समोर आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!