सातारा : काही दिवसांपूर्वी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांनी अटक केली आहे. तिला 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना स्वीकारताना स्थानिक गुन्हे शाखेने रंगेहाथ पकडले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून, या महिलेने तब्बल 3 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे उघड झाले आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सदर कारवाई केली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या आरोपांचे प्रकरण मिटवण्यासाठी संबंधित महिलेने तब्बल ३ कोटींची खंडणी मागितली होती. त्यानंतर या महिलेला एक कोटींची खंडणी स्वीकारताना रंगेहाथ पडकण्यात आले आहे. अटकेनंतर पोलिसांनी या महिलेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधित महिलेने काही दिवसांपूर्वीच जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर विरोधी पक्षांनी देखील या प्रकरणी गोरेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु, आता आरोप करणाऱ्या महिलेनेच हे प्रकरण मिटवण्यासाठी खंडणी मागितल्याने या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.


