Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘ती’ एक चूक पोलिसांच्या लक्षात आली अन् हिंजवडी हत्याकांडचा पर्दाफाश झाला; ड्रायव्हरवर संशय कसा आला? जाणून घ्या इन्साईड स्टोरी

‘ती’ एक चूक पोलिसांच्या लक्षात आली अन् हिंजवडी हत्याकांडचा पर्दाफाश झाला; ड्रायव्हरवर संशय कसा आला? जाणून घ्या इन्साईड स्टोरी

पुणे: हिंजवडीमध्ये बुधवारी (दि. 20) सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या बारा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागली. या अपघातात चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, आता याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंजवडीमधील ही घटना अपघात नसल्याचे उघड झाले आहे. टेम्पो ट्रॅव्हलर चालकाने केमिकल आणून सीटखाली ठेवत भडका घडवून आणला. फेज 1 मध्ये एकेरी वाहतूक असलेला रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली. त्यानंतर केमिकलचा भडका उडाला. भडका उडण्यापूर्वी चालक गाडीतून उतरला होता. त्याचा दिवाळीत पगार कापला होता. तसेच गाडीतील सहकारी कर्मचाऱ्यांनी त्रास दिला होता म्हणून त्याने हे सर्व घडवून आणल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्याचा तिघांशी वाद होता, त्यांना संपवायचे म्हणून त्याने हा प्रकार केला. याप्रकरणी पोलिसांनी बसचालक जनार्दन हंबर्डीकरला (वय 56) ताब्यात घेतले असून त्याने याची कबुली दिली

घटना घडल्यानंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी चालक जनार्दन हंबर्डीकरला भाजल्यामुळे झालेल्या जखमा आणि तो दाखवत असलेल्या वेदना यामध्ये फरक असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. हंबर्डीकर हा किरकोळ जखमी असूनही तो वारंवार शुद्ध हरपल्याचे नाटक करत होता. ही बाब तिथे उपस्थित असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांच्या लक्षात आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे या घटनेबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे त्याच्यावरचा पोलिसांचा संशय अधिक बळावला.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला. या तपासादरम्यान घटनास्थळाजवळील एका कंपनीच्या सीसीटीव्हीमध्ये चालक हंबर्डीकर गाडीच्या सीटखाली काहीतरी पेटवत असल्याचे निदर्शनास आले. तसेच, टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागताच हंबर्डीकर हा गाडीतून उतरल्याचे देखील या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. त्यामुळे काहीतरी गडबड असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

त्यानंतर पोलिसांनी चालक जनार्दन हंबर्डीकरची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने पोलिसांना जी माहिती दिली त्याने सर्वांनाच धक्का बसला. कर्मचाऱ्यांचा राग आल्याने हंबर्डीकर याने गाडीला आग लावून त्यांना मारण्याचा कट रचल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!