Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

NEET Paper Leak : मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमधील ‘गॉड’ कोण? CBI तपासात धक्कादायक खुलासे

NEET Paper Leak : मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमधील ‘गॉड’ कोण? CBI तपासात धक्कादायक खुलासे

NEET Paper Leak : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या तपासातून आता आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. सीबीआयने अटक केलेल्या मनीषा हवालदार हिच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या फॉरेन्सिक तपासात अनेक संशयास्पद बाबी उघड झाल्या आहेत.

सीबीआयने २२ मे रोजी सदाशिव पेठेतील निवासस्थानी छापा टाकत मोबाईल, लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि नीट प्रश्नपत्रिकेशी संबंधित कागदपत्रे जप्त केली होती. तपासादरम्यान मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये ‘God’ आणि ‘Dr. Usha’ या नावांनी सेव्ह केलेले काही संशयास्पद क्रमांक आढळले. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘God’ नावाने सेव्ह असलेला नंबर तेजस शहा या विद्यार्थ्याचा असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न पोहोचवणे आणि पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी तेजस शहा मध्यस्थ म्हणून काम करत होता. या प्रकरणातील डिजिटल पुरावे आता तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत.

दरम्यान, तपासाची चाहूल लागताच मनीषा हवालदारने पुरावे नष्ट करण्यासाठी मोठी शक्कल लढवल्याचे उघड झाले आहे. तिने फिजिक्स विषयाच्या स्वतः तयार केलेल्या हस्तलिखित नोट्स जाळून टाकल्याचा आरोप आहे. तसेच सहआरोपी आणि बायोलॉजी प्राध्यापिका मनीषा मांढरे हिच्यासोबतचे व्हॉट्सॲप चॅट्स आणि मेसेजेसही डिलीट करण्यात आले होते.

विशेष म्हणजे, स्वतःच्या मोबाईलबरोबरच पतीच्या फोनचाही वापर करून प्रश्नमालिका पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआय सायबर तज्ज्ञांच्या मदतीने डिलीट केलेले डेटा आणि डिजिटल पुरावे पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

सीबीआयच्या झाडाझडतीदरम्यान हवालदारच्या घरातून १ लाख १ हजार ९३० रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात काही विद्यार्थ्यांना प्रश्न पुरवण्यात आल्याची कबुलीही चौकशीत मिळाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, तपासाचा विस्तार आता पुणे, लातूर आणि राजस्थानपर्यंत झाला असून, NTA च्या पॅनेलवरील रसायनशास्त्र विषयाच्या आणखी एका तज्ज्ञ प्राध्यापिकेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रश्नपत्रिका तयार करणे, भाषांतर, प्रिंटिंग आणि डिजिटल ट्रान्सफर प्रक्रियेतच गळती झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!