शिरूर : शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील कोलवडी साष्टे परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या उपकेंद्रामुळे कोलवडी व परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा, प्रसूती सेवा, बालकांचे लसीकरण, तपासण्या आणि औषधोपचार यासह आरोग्यावरील मार्गदर्शन गावाच्या पातळीवरच मिळणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार माऊली आबा कटके उपस्थित होते. ते म्हणाले की, “ग्रामस्थांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. ग्रामपंचायत, स्थानिक नागरिक यांच्या सहकार्याने हा प्रकल्प साकार झाला. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची ही पूर्तता असून आता नागरिकांना गावातच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होईल. पुढील काळात रस्ते, पाणीपुरवठा, शैक्षणिक संस्था, खेळाची मैदाने, कौशल्यविकास केंद्र व महिला उपक्रम सुरू करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून विकासाचे काम पुढे नेण्यात येईल.”
या कार्यक्रमात प्रदीप कंद, सरपंच विनायक गायकवाड, यशवंतचे संचालक रामदास गायकवाड, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीपनाना वाल्हेकर, माजी सरपंच सचिन शेठ तुपे, यशवंत व्हाईट चेअरमन किशोर उंदरे, पैलवान दत्तात्रय काळे, माजी उपसरपंच विकास कांचन, पंकजभाऊ गायकवाड, मिलापचंद गायकवाड, किरण काकडे, युवराज काकडे, अमर गायकवाड, उपसरपंच संदीप गायकवाड, माजी उपसरपंच निलेश रिकामे, ग्रामपंचायत सदस्य सचिन गायकवाड, स्वप्निल नितनवरे, योगेश मुरकुटे, शितल भाडळे, प्रिया गायकवाड, चैत्राली गायकवाड, स्वाती गायकवाड, निशाताई भोर, नीता भालसिंग, प्रियांका शितोळे, ग्रामसेविका सुजाता पवार, नानासाहेब भाडळे, जयसिंग गायकवाड, पोलीस पाटील मीनाताई गायकवाड, विलास भोसले, रमेश गायकवाड, राजुशेठ गायकवाड, विश्वास गायकवाड, अशोक गायकवाड, अविनाश गायकवाड, नाना गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
सरपंच विनायकभाऊ गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मागणीची आज पूर्तता झाली आहे. आमदार माऊली आबा कटके यांच्या सहकार्यामुळे हे उपकेंद्र उभारल गेल. शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना गावाच्या पातळीवर आरोग्य सुविधा मिळण्याचा मोठा फायदा झाला आहे. या उपक्रमासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार.”
ग्रामस्थांनीही उद्घाटनानंतर आनंद व्यक्त करत म्हणाले, “आता उपचारासाठी शहरात जाण्याची गरज नाही, सर्व प्राथमिक सुविधा गावात उपलब्ध होतील. विशेषतः महिलांना, वृद्ध नागरिकांना व लहान मुलांना याचा फार मोठा फायदा होणार आहे.”
हे उपकेंद्र हवेली तालुका आणि शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचा नवा अध्याय ठरला असून, गावपातळीवर आरोग्य सेवा सुधारण्यास मोठा हातभार लावणार आहे.