Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune: पुणे तिथे काय उणे! खड्ड्यांना वैतागलेल्या पुणेकरांकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर खराब रस्त्यांची पूजा

Pune: पुणे तिथे काय उणे! खड्ड्यांना वैतागलेल्या पुणेकरांकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर खराब रस्त्यांची पूजा

Pune: पुण्यात पावसामुळे रस्ते प्रचंड प्रमाणात खराब झाले आहेत. जागोजागी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे पुणेकरांची प्रशासनाच्या कामचुकार कारभारावर नाराजी दसऱ्याच्या मुहूर्तावर उघडपणे दिसून आली. वैतागलेल्या पुणेकरांनी खराब रस्ते प्रशासनाच्या नजरेत आणण्यासाठी रस्त्यांची चक्क पूजा केली.खड्ड्यांची पूजा करत वारजे परिसरातील नागरिकांनी अनोखा दसरा साजरा केला.आम आदमी पार्टी आणि त्रस्त पुणेकरांकडून ही पूजा करण्यात आली आहे. या अनोखा दसरा उत्सवाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वारजे रामनगर ते शिवणे कॅनल रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांबाबत महानगरपालिकेच्या विरोधात नागरिकांनी खड्ड्यांची आणि रस्त्यांची पूजा करत दसरा साजरा केला. खड्ड्यांभोवती रांगोळी काढत आणि खड्ड्यांना हार घालत आपकडून दसऱ्याची पूजा करण्यात आली.

पुण्यातील खराब रस्त्यांची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवडाभर आधीच केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांना पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा फटका बसला. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी थेट महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे तक्रार केली होती. “शहरात खड्डे खूप झाले आहेत, रस्ते नीट करा,” अशा सूचना त्यांनी दिल्याने पथ विभागाचे दिले होते.

शहरातील अनेक लहान-मोठ्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे.रस्ते असमान असल्याने अपघातांचा धोका वाढला असून वाहनचालकांचे हाल होत आहेत. नागरिक सातत्याने तक्रारी करत असतानाच मुख्यमंत्र्यांनीच खड्ड्यांवर बोट ठेवले असल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिका कोट्यवधींचा खर्च करून रस्त्यांची रिसरफेसिंग व पॅचवर्क करते. तरीही पावसाळ्यात खड्डे पडणे सुरूच असते. यामुळे रस्त्याची चाळण होऊन खडी पसरते, वाहतूक मंदावते आणि नंतर पुन्हा खड्डे बुजविण्याची मोहीम सुरू केली जाते. त्यावर आता प्रशासन याची किती आणि कधी दखल घेते हे पहावे लागेल.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!