Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nashik Munciple Corporation: कुंभमेळ्याच्या मुहूर्तावर नाशिकमध्ये नोकरभरती; महापालिकेत 246 पदे भरण्यास परवानगी

Nashik Munciple Corporation: कुंभमेळ्याच्या मुहूर्तावर नाशिकमध्ये नोकरभरती; महापालिकेत 246 पदे भरण्यास परवानगी

Nashik Munciple Corporation: नाशिकमध्ये 1994 च्या काळानंतर प्रथमच महापालिकेत 246 पदे भरण्यास राज्य शासनाने परवानगी सध्या दिली आहे. कुंभमेळ्याच्या मुहूर्तावर नाशिकमध्ये नोकरभरती आयोजित करण्यात आली आहे. यात स्टेशन ऑफिसर, सब ऑफिसर, चालक,यंत्रचालक, फायरमन यांची भरती करण्यात येणार असल्याचे पत्र मनपा प्रशासनाला राज्य शासनाकडून प्राप्त झाले आहे. शहराचा प्रचंड विस्तार, उंच इमारतींचे वाढते बांधकाम, औद्योगिक परिसरात वाढणारी आग-अपघातांची प्रकरणे आणि आगामी सिंहस्थाच्या काळातील लाखोंच्या गर्दीचे व्यवस्थापन या सगळ्यांचा विचार करता दलाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणे अत्यावश्यक होते.

नाशिकमध्ये वाढत्या शहराचे क्षेत्रफळ 267 चौरस मीटर असून, लोकसंख्या अंदाजे 25 लाख आहे. शहराची वाढ होत असताना दुसरीकडे आगीचे धोकेही वाढले आहेत. त्यामुळे आग अथवा अपघात प्रसंगी नागरिकांना घटनास्थळी त्वरित अग्निशमन विभागाची मदत घ्यावी लागते. नागरिकांचे सौरक्षणा व मालमत्तेचे रक्षण करावे लागते. सद्यस्थितीत या विभागातील 80 टक्के कर्मचारी हे 52 वयाच्या पुढे असून, अनेक कर्मचारी एक ते दोन वर्षांत सेवानिवृत्त होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भरती करणे गरजेचे होते. महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी एकूण 529 पदे शासनाने मंजूर केलेली आहेत. मात्र सध्या प्रत्यक्षात फक्त 1010 कर्मचारी कार्यरत असून, तब्बल 428 पदे रिक्त आहेत. यामुळे संपूर्ण विभागावर ताण निर्माण झाला होता.

भरती
स्टेशन कार्यालय – एकूण 3
सब ऑफिस- एकूण 9
यंत्रचालक – एकूण 36
फायरमन – एकूण 198

शहराचा प्रचंड विस्तार, उंच इमारतींचे वाढते बांधकाम, औद्योगिक परिसरात वाढणारी आग-अपघातांची प्रकरणे आणि आगामी सिंहस्थाच्या काळातील लाखोंच्या गर्दीचे व्यवस्थापन या सगळ्यांचा विचार करता दलाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणे अत्यावश्यक होते. महापालिकेने यापूर्वीही शासनाकडे या भरतीची मागणी केली होती. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नव्हता. मात्र आता शासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. अग्निशमन विभागाचे सध्या फक्त 1010 मनुष्यबळावर काम सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!