Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Cyclone Shakhti: महाराष्ट्राच्या दिशेनं येतंय ‘शक्ती’शाली चक्रीवादळ, हवामान खात्याचा अलर्ट

Cyclone Shakhti: महाराष्ट्राच्या दिशेनं येतंय ‘शक्ती’शाली चक्रीवादळ, हवामान खात्याचा अलर्ट

Cyclone Shakhti: यंदाचे पहिले चक्रीवादळ अरबी समुद्रात सक्रिय झाले आहे. श्रीलंकेने चक्रीवादळला शक्ती हे नाव दिले आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने या चक्रीवादळाबाबत संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे. IMD नुसार, किनारपट्टीवर 100 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसादरम्यान घराबाहेर न पडण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.

दिनांक 3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान उच्च ते मध्यम चक्रीवादळ प्रभावी असू शकते. शक्ती चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे,पालघर, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या जिल्ह्यांना फटका बसू शकतो, त्यामुळे त्यांना इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे समुद्रातील स्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहील, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा कठोर इशारा मच्छिमारांना देण्यात आला आहे. उंच लाटा आणि वेगवान सागरी प्रवाह जीवानिशी धोकादायक ठरू शकतात.

या चक्रीवादळामुळे किनारी भागातील आणि सखल भागातील रहिवाशांना भरती आणि पाणी साचण्याच्या शक्यतेमुळे सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. किनारी भागांसोबतच हवामान विभागाने विदर्भाच्या पूर्वेकडील आणि मराठवाड्याच्या काही भागांतही अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. उत्तर कोकण विभागात सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची आहे.
आणि सखल भागातील रहिवाशांना भरती आणि पाणी साचण्याच्या शक्यतेमुळे सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. किनारी भागांसोबतच हवामान विभागाने विदर्भाच्या पूर्वेकडील आणि मराठवाड्याच्या काही भागांतही अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. उत्तर कोकण विभागात सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची आहे.

IMD च्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाला तातडीने सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय करण्यासोबतच, पूर येण्याची शक्यता असलेल्या भागांत नागरिकांना हलवण्याची तयारी पूर्ण ठेवण्याचे आणि जनतेपर्यंत वेळोवेळी आवश्यक माहिती पोहोचवण्याचे सांगण्यात आले आहे. समुद्रात असलेल्या सर्व नौकांना तातडीने किनाऱ्यावर परतण्याचे निर्देश दिले गेले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!