Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ashok Kharat : अशोक खरात विरोधातील ‘ED’च्या कारवाईने रूपाली चाकणकर अडचणीत?

Ashok Kharat : अशोक खरात विरोधातील ‘ED’च्या कारवाईने रूपाली चाकणकर अडचणीत?

ED Action News : वादग्रस्त कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालय (ED) ने मोठी कारवाई सुरू केली असून त्यांच्या मालमत्तांवर धाडी टाकत आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. या कारवाईमुळे खरात यांच्या भोवतीचा फास आणखी आवळला गेला आहे.

ईडीकडून नाशिकमधील घर, मिरगाव येथील फार्महाऊस यासह विविध मालमत्ता आणि वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्व मालमत्तांचे मूल्यांकन आणि त्यासाठी वापरलेल्या पैशांचा स्त्रोत तपासला जाणार आहे. तसेच शिर्डीतील जगदंबा पतसंस्था आणि कोपरगावमधील समता पतसंस्थेतील शंभरहून अधिक संशयास्पद खात्यांची चौकशीही सुरू आहे.

तपासादरम्यान मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिर येथील देणग्यांचे व्यवहारही संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. या मंदिरासाठी मोठ्या प्रमाणावर निधी जमा झाल्याची माहिती समोर आली असून त्याचा स्रोत ईडी तपासत आहे.

दरम्यान, या मंदिराच्या विश्वस्तांमध्ये रूपाली चाकणकर यांचे नाव असल्याने त्यांच्यावरही चौकशीची टांगती तलवार आहे. मंदिराच्या आर्थिक व्यवहारांबाबत त्यांना ईडीकडून चौकशीसाठी पाचारण केले जाऊ शकते.

ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचा वापर न्यायालयाचा निकाल येईपर्यंत संबंधितांना करता येत नाही. त्यामुळे खरात कुटुंबीयांसमोर मोठे आर्थिक आणि कायदेशीर आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणात पुढील काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!