Shiv Sena UBT : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. १० जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारत निवडणूक आयोग यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १२ मे रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपला ५, शिवसेनेला २, राष्ट्रवादीला १ आणि महाविकास आघाडीला १ जागा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील सहयोगी पक्षांकडून उद्धव ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा असल्याचे संकेत आहेत. मात्र, स्वतः उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाण्यास फारसे इच्छुक नसल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत पर्यायी उमेदवार कोण असणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारीसाठी अंबादास दानवे, सुषमा अंधारे, विनायक राऊत, राजन विचारे, वैभव नाही, आणि सुरज चव्हाण या नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
उद्धव ठाकरे स्वतः उमेदवारी स्वीकारतात की पक्षातील इतर नेत्याला संधी देतात, यावर अंतिम निर्णय अवलंबून राहणार आहे. त्यामुळे ठाकरेंच्या गोटात उमेदवारीचा सस्पेन्स कायम आहे.
दरम्यान, या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल असून १२ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडणार आहे. त्यानंतर संध्याकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.


