Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nagpur Heat Wave: नागपूरकरांनो सावधान! उद्या उष्णतेचा ‘यलो अलर्ट’; ‘या’ दिवशी सर्व शाळांना सुट्टी जाहीर

Nagpur Heat Wave: नागपूरकरांनो सावधान! उद्या उष्णतेचा ‘यलो अलर्ट’; ‘या’ दिवशी सर्व शाळांना सुट्टी जाहीर

Nagpur Heat Wave: विदर्भात सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून नागपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) गंभीर इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शनिवार, 18 एप्रिल 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांना तात्काळ सुट्टी जाहीर केली आहे. हवामान विभागाने उद्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केल्याने प्रशासनाने हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलले आहे.

पारा 43 अंशांच्या पार
मार्च महिन्यापासूनच नागपूरचा पारा सातत्याने चढत असून सध्या तो 43 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. वाढत्या उन्हाचा धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात ‘हीट ॲक्शन प्लॅन’ लागू केला आहे. या अंतर्गत जिल्ह्यात एकूण 56 विशेष शीतकक्ष (Cooling Centers) उभारण्यात आले आहेत. यामध्ये 2 उपजिल्हा रुग्णालये आणि 11 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. या कक्षांमध्ये एसी, हाय-स्पीड कुलर्स, बर्फाचा साठा आणि उष्माघाताच्या रुग्णांसाठी ‘कोल्ड बाथ’ची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

आरोग्य यंत्रणा सज्ज आणि शाळांना नियमावली
उष्माघाताचा सामना करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर शीघ्र कृती दल तैनात करण्यात आले असून आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून दिला आहे. शनिवारच्या सुट्टीनंतरही शाळांनी खबरदारी म्हणून सकाळच्या सत्रात वर्ग भरवणे, विद्यार्थ्यांना दिवसातून दोनदा ब्रेक देऊन पाणी पिण्यास प्रोत्साहित करणे आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

ग्रामीण भागासाठी विशेष आवाहन
ग्रामीण भागात उन्हाचा तडाखा अधिक जाणवत असल्याने ग्रामपंचायतींमार्फत दवंडी पिटवून नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांनी शेतीची कामे सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा उरकावीत, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करावे आणि उष्माघाताची लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!