Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Jitendra Shelke Accident: अशोक खरातच्या जवळच्या सहकाऱ्याचा अपघातात मृत्यू; कारचा चक्काचूर

Jitendra Shelke Accident: अशोक खरातच्या जवळच्या सहकाऱ्याचा अपघातात मृत्यू; कारचा चक्काचूर

Jitendra Shelke Accident: ‘मृत्यूचा महामार्ग’ अशी ओळख होऊ लागलेल्या समृद्धी महामार्गावर रक्ताचा सडा पडणे अद्यापही थांबलेले नाही. शिर्डीकडे जात असताना धोत्रे गावाजवळ झालेल्या एका अंगावर काटा आणणाऱ्या अपघातात अशोक खरात यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे जितेंद्र शेळके यांना आपला जीव गमवावा लागला आहे. उभ्या असलेल्या कंटेनरला कारने पाठीमागून दिलेल्या भीषण धडकेमुळे ही दुर्घटना घडली.

कारचा चक्काचूर, शेळकेंचा जागीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र शेळके हे आपल्या पत्नी आणि मुलासह संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने निघाले होते. प्रवासादरम्यान धोत्रे गावाच्या शिवारात रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका अवजड कंटेनरचा अंदाज चालकाला आला नाही. वेग जास्त असल्याने कार थेट कंटेनरच्या मागील भागात जाऊन आदळली. हा आघात इतका जबरदस्त होता की कारचा लोखंडी ढिगारा झाला आणि त्यात शेळके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

पत्नी आणि मुलाचा श्वास टांगणीला
या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेत शेळके यांचा मुलगा आणि पत्नी गंभीर रित्या जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असले तरी, शेळके यांची पत्नी बराच वेळ कारच्या ढिगाऱ्यात अडकून पडली होती. स्थानिक प्रशासन आणि पोलीस पथकाने क्रेनच्या मदतीने कारचे पत्रे कापून त्यांना बाहेर काढले. सध्या दोघांचीही झुंज मृत्यूशी सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

तणावाचे सावट अन् घातपाताची चर्चा?
जितेंद्र शेळके हे केवळ ‘शिवनिका ट्रस्ट’चे उपाध्यक्ष नव्हते, तर ते लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरात यांचे सर्वात विश्वासू साथीदार होते. खरात यांना अटक झाल्यापासून शेळके प्रचंड मानसिक दडपणाखाली होते, अशी चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे. खरात यांच्या व्यवसायातील भागीदारी आणि इतर कायदेशीर गुंतागुंतीमुळे ते अस्वस्थ होते. याच मानसिक संघर्षात असताना त्यांच्या आयुष्याचा असा करुण अंत झाला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!