Bhiwandi Crime: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एका अत्यंत धक्कादायक प्रकरणाचा उलगडा झाला आहे. येथे सलामत अन्सारी नावाच्या नराधमाने सात वर्षांच्या मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, अन्सारी याआधीही अशाच प्रकारचा गुन्हा करुन फरार झाला होता.
सप्टेंबर 2023 मध्ये भिवंडी शहरातील फेणेगाव येथील सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्यानंतर त्याला पोलिसांनी बिहारमधून अटक केली होती, मात्र ऑगस्ट 2025 मध्ये न्यायालयीन सुनावणीसाठी हजर करताना तो पुन्हा फरार झाला.
हेही वाचा – दुःखद घटना..! मुलाची आत्महत्या, १२ तासात बापानेही मृत्यूला कवटाळले, बाप-लेकाच्या निधनाने नांदेड हादरलं
फरार झाल्यानंतर काही दिवसांतच अन्सारीने पुन्हा भिवंडी परिसरातील सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा आणखी तपास सुरु आहे. या प्रकरणामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. पीडित कुटुंबीयांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


