Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! आधी पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली, नंतर कोयत्याने वार करून केली निर्घृण हत्या

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! आधी पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली, नंतर कोयत्याने वार करून केली निर्घृण हत्या

Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात खळबळजनक घटना घडली आहे. भादोले गावाजवळ पतीने पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून धारदार कोयत्याने सपासप वार करत तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत महिलेचे नाव रोहिणी प्रशांत पाटील (वय 28, रा. भादोले) असे आहे. रोहिणीच्या हत्येचा आरोप तिचा पती प्रशांत पाटील याच्यावर आहे. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास कोरेगाव-भादोले रस्त्यालगत झुंजीनाना मळ्याजवळ हा प्रकार घडला. पत्नीसमवेत मोटारसायकलने येत असताना अचानक प्रशांतने प्रथम रोहिणीच्या डोळ्यात चटणी टाकली आणि नंतर कोयत्याने गळा व चेहऱ्यावर प्राणघातक वार केले.

हेही वाचा – नांदेड हादरलं! ‘बहिणीचा नाद सोड…’; प्रेम प्रकरणातून प्रेयसीच्या भावाने केली तरुणाची हत्या

गंभीर जखमी झालेली रोहिणी जागीच कोसळली व तिचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर प्रशांत थेट गावात पोहोचला. त्याने गावकऱ्यांना पत्नीचा खून केल्याचे सांगितले. तसेच ‘मुलींकडे लक्ष ठेवा, मी आता काही महिन्यांसाठी गावात राहणार नाही,’ असं सांगितलं आणि तिथून पळ काढला. यानंतर गावात एकच खळबळ उडाली.

हेही वाचा – Double Murder : बुलढाण्यात पोटच्या गोळ्याने केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; जमिनीच्या वादाने कुटुंबाचा बळी

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा व तपासाची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. संशयित पती प्रशांत पाटील फरार झाला होता, मात्र पोलिसांनी रात्री उशिरा त्याला ताब्यात घेतले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!