Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: लोणी काळभोरमध्ये झोमॅटो डिलीव्हरी बॉयला मारहाण, तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Pune Crime: लोणी काळभोरमध्ये झोमॅटो डिलीव्हरी बॉयला मारहाण, तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

उरुळी कांचन: लोणी काळभोर परिसरात झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. स्वप्निल काळे (वय ३७) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.झोमॅटो डिलिव्हरी बॉयला लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपी पसार झाले.

पोलिसांनी तपासादरम्यान, तिघांना अटक केली. तत्काळ कारवाई करत ताब्यात घेतले. ही घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती परिसरातील झुडीओ शॉपसमोर गुरुवारी (ता . २) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी स्वप्रिल बंगले (वय २४), रोहन लोंढे (वय २६), अजित चांदणे (वय २१) यांना लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, झोमॅटो डिलिव्हरी बॉय स्वप्निल काळे हे गुरुवारी (ता . २) दुपादुपारी ४ वा जण्याच्या सुमारास लोणी काळभोर येथील वृंदावन हॉटेल येथून जेवणाची ऑर्डर घेऊन जात होते. तेव्हा ऑर्डर रद्द करण्यास सांगितल्यानंतर डिलिव्हरी बॉयने ती ऑर्डर रद्द केली. मात्र, काही वेळाने आरोपींनी त्याच्याशी हुज्जत घालून पुन्हातीच ऑर्डर मागितली. त्यानंतर त्यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि मोबाईल व पार्सल घेऊन तेथून पसार झाले. त्यानंतर लोणीकाळभोर पोलिसांनी तत्काळ
कारवाई करतवरील ती नही ताब्यात घेतले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णाबाबर, पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर आणि रत्नदिप बिराजदार यांनी कारवाई केली .

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!