पुणे : सरकारी बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रीयीकृत बँक अशी ओळख असलेल्या कॅनरा बँकेत येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
कॅनरा बँकेत पदवीधर अप्रेंटिस या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला देशभरात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 3500 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://canarabank.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटिस.
– एकूण रिक्त पदे : ३५०० पदे (महाराष्ट्रात २०१ पदे).
– नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
– शैक्षणिक पात्रता : पदवी.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 15,000
– वयोमर्यादा : 20 वर्षे ते 28 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (नोंदणी).
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 23 सप्टेंबर 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑक्टोबर 2025


